पानिपत जिओसिन्थेटिक्स चे दर्जेदार उत्पादन कॅमल एच. डी. पी. ई. ताडपत्री. ज्याचा उपयोग मुख्यतः शेती, शेततळे, पाणी साठविणे, शेड, कांदा चाळ,कुक्कुटपालन पडदे, वीटभट्टी, बांधकाम व्यवसाय, ट्रक, टेम्पो कव्हर इत्यादीसाठी होतो.

कॅमल ताडपत्री वैशिष्ट्ये

कोहिनूर पॉलिमर्स

  • जिओमेंम्ब्रेनचे उत्पादन व अस्तरीकरण करणारी सन१९६४ पासून औद्योगिक क्षेत्रात व कृषी क्षेत्रास सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव नामांकित कंपनी आहे. गेल्या ५० वर्षाहून अधिक काळापासून शेतकऱ्यांनी आम्हाला त्यांची सेवा करण्याची संधी दिली आहे.
  • आय एस आय १५३५१ प्रमाणित ७ थरांचे ३००, ५०० तसेच ७५० मायक्रॉन एचडीपीई जिओमेंम्ब्रेन उपलब्ध.
  • आयएसओ १५००ः२०१५ प्रमाणित उत्पादन प्रक्रियाद्वारे (सिंगल फ्युजन सिमिंग टेक्नॉलॉजी) वापर करून प्रत्यक्ष साईटवर शेततळ्याच्या आकारमाणानुसार अस्तरीकरण करून देणारी कंपनी.
  • १४४ इंच रूंदीचे एचडीपीई फॅब्रीक पासुन जिओमेंम्ब्रेन बनवणारी कंपनी
  • राष्ट्रीय फलोत्पादन व महाराष्ट्र शासन कृषी योजनेअंतर्गत नोंदणीकृत

शेततळे इन्स्टॉलेशन साठीची पुर्व तयारी.

१) ढगाळ वातावरण नसावे.
२) ८ ते १० KVa जनरेटर
३) ८ ते १० कुशल कामगार
४) ६ ते ८ दोरखंड व इलेक्ट्रीक केबल
५) ८ फुट लांब व १ ते १.५ फुट रूंद सपाट फळी

शेततळ्याच्या अस्तरीकरणासाठी IS 15351:2015 प्रमाणे रिझनफोर्सडएचडीपीई जिओमेंम्ब्रेनचे आवश्यक तांत्रीक माहीती

Table 1 Requirement for Laminated HDPE Woven Geomembrane for Water Proof Lining (Clauses 5.1.1 and 6.2)

पानिपत जिओसिन्थेटिक्स विषयी.

  • २०१० पासुन इन्स्टॉलेशन क्षेत्रात कार्यरत अग्रगण्य फर्म.
  • १० हजार स्क्वेअरफुटाचे प्रशस्त वर्कशॉप.
  • अत्याधुनिक सिलिंग मशिन्सद्वारे ७२ ते ८४ फुट रूंदीचे पॅनल्सची निर्मिती, ज्यामुळे कमीत कमी वेळेत शेततळे जोडणी शक्य होते.
  • अनुभवी व कुशल ऑपरेटर्स.
  • विक्री पश्चात तत्पर सेवा.
  • शेतकऱ्यांना वेळेत जिओमेंम्ब्रेन जोडणी करून देण्यात आग्रेसर असणारी फर्म.

जिओमेंम्ब्रेन उत्पादन करणारी व जिओमेंम्ब्रेन जोडणी करणारी फर्म हे दोन स्वतंत्र घटक आहेत, त्यांची निवड करतांना खालील काळजी घ्यावी:

• कोणतीही जिओमेंम्ब्रेन कंपनीची निवड करतांना त्या कंपनीचा या क्षेत्रातील अनुभव विचारात घ्यावा.
• कोणत्याही जिओमेंम्ब्रेन कंपनीची निवड फक्त सॅम्पल पीस बघुन न करता प्रत्यक्ष शेततळ्यावरील जिओमेंम्ब्रेन बघुनच करावी.
• कोणत्याही जिओमेंम्ब्रेन कंपनीची निवड करतांना, जिओमेंम्ब्रेनची वेळेत उपलब्धता व वेळेत जोडणी करून देण्यासंदर्भातील त्या शेतकऱ्यांचा अनुभव विचारात घ्यावा.
• कोणतीही जिओमेंम्ब्रेन कंपनी निवडतांना कंपनीच्या मागील ८ ते १० वर्षापूर्वीच्या जिओमेंम्ब्रेनची सद्य स्थिती बघावी किंवा शेतकऱ्याचा अनुभव विचारात घ्यावा.

• कोणत्याही अस्तरीकरण / जोडणी करणाऱ्या फर्मचा शेततळ्याची मापे घेण्याचा अनुभव असावा, जेणेकरून जिओमेंम्ब्रेन अवास्तव मापे घेतल्यामुळे वाया जाणार नाही अथवा जिओमेंम्ब्रेन कमी पडणार नाही.
• कोणत्याही अस्तरीकरण / जोडणी करणाऱ्या फर्मचा अस्तरीकरण/जोडणी क्षेत्रातील किमान ५ वर्षांचा अनुभव असावा.
• कोणत्याही अस्तरीकरण / जोडणी करणारी फर्म निवडतांना त्या फर्मकडे जोडणीसाठी अत्याधुनिक मशिन्स व अनुभवी ऑपरेटर्स असावेत.
कोणत्याही अस्तरीकरण / जोडणी करणाऱ्या फर्मचा नातेवाईक, मित्र व इतर शेतकऱ्याचे अस्तरीकरण/जोडणी संदर्भात व विक्री पश्चात सेवेसंदर्भात आलेला अनुभव विचारात घ्यावा.
• कोणत्याही शेततळे अच्छादनाचे काम अधिकृत वितरकामार्फतच करून घ्यावे, जेणेकरून गुणवत्तापुर्ण व दर्जेदार उत्पादन आणि विक्रीपश्चात सेवा वेळेत मिळेल.

शेततळे बनवितांना योग्य खबरदारी न घेतल्यास बऱ्याच समस्या निर्माण होतात. त्या समस्यांवर मात करण्याकरीता खालील प्रमाणे उपाययोजना कराव्यात.

शेततळ्याकरीता योग्य जागेची निवड करतांना कठिण, कडक, जिवंत पाण्याचे झरे / उपळणारी जमिन किंवा वाहणाऱ्या पाण्याला अडथळा निर्माण होणारी जागा नसावी. खोलगट भागावर किंवा डोंगराच्या पायथ्याशी अथवा डोंगर कपारीजवळ तसेच पूर्वीची विहीर, तलाव, खड्डा, किंवा दगडखाण बुजवून शेततळे तयार करू नये.

शेततळ्याचे खोदकाम पोकलेन मशिनद्वारे करावे. शेततळे खोदताना प्रथम सपाट जमिनीवरील मऊ मातीचा थर शेततळ्याच्या बाहेरील जागेत ढिग करून साठवावा. शेततळ्याचे बांध बनविताना खोदाई दरम्यान निघणाऱ्या मुरूमाचा वापर करावा. खोदाई दरम्यान निघालेले मोठे दगड, ब्रेकिंग / ब्लास्टिंग करून निघालेले दगड बांध बनविताना वापरू नयेत. मोठमोठे दगड बांधात वापरल्याने दगडामध्ये पोकळी (कॅव्हीटी) राहते व पाणी बाहेरच्या बाजुने बांधामध्ये गेल्याने मुरूम मातीची धुप होते, त्यामुळे बांध खचण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे शेततळ्यास धोका निर्माण होऊ शकतो. बांध व तळ बनवितांना सर्वात शेवटी मातीचा थर द्यावा व त्याची दबाई (कॉम्पॅक्शन) करावे.

प्रत्यक्ष शेततळ्याच्या आकारमानानुसार जिओमेम्ब्रेनची जोडणी केल्यामुळे अस्तरीकरण एकसमान होते. बांधाच्या उताराच्या बाजूने जिओमेम्ब्रेनला उभे (व्हर्टीकल) जोड केल्याने त्यावर ताण येत नाही. यामुळे जिओमेम्ब्रेनचे आयुष्यमान वाढते.

त्यामध्ये कागद मातीखाली बुजवून घेता येईल. एचडीपीई जिओमेम्ब्रेन बसवितांना ते उडून जाऊ नये म्हणून तळ्याच्या आकारमाना प्रमाणे त्यावर मातीच्या / वाळूच्या गोण्या भरून ठेवाव्यात.

शेततळ्यामध्ये जिओमेम्ब्रेन बसवितांना त्यांचे (जॉईंट) जोड स्वतःच्या निरीक्षणाखाली कुशल कारागिराकडून ठरवून दिलेल्या नियमानुसार अत्याधुनिक मशिनद्वारे तळ्याच्या आकाराप्रमाणे व्यवस्थित जोडावेत.

जिओमेंम्ब्रेन आच्छादन केल्यानंतर त्यात लवकरात लवकर पाणी पुर्ण क्षमतेने भरल्यानंतरच जिओमेंम्ब्रेन भिंतीवरील चरामध्ये मातीने बुजवुन घ्यावे. त्यामुळे भविष्यात उंदरांमुळे होणारा उपद्रव कमी होतो. पाळीव प्राणी/वन्य प्राणी तलावाकडे जावू नये म्हणून तळ्याला कुंपण / जाळी बसविणे गरजेचे आहे.

शेततळ्याचे आयुर्मान वाढविणारे घटक.

  • शेततळ्याचे जिओमेम्ब्रेन अच्छादनापुर्वी शेततळ्यात मुबलक प्रमाणात मातीचा वापर केल्यास जिओमेम्ब्रेन दगड व मुरूम यामुळे खराब होत नाही.
  • शेततळे खोदतांना भिंतींना स्लोप कमी असल्यास जिओमेम्ब्रेन टांगते राहते व हवेत आपटत राहते ते टाळण्यासाठी भिंतीना जास्तीत जास्त स्लोप द्यावा.
  • शेततळे खोदतांना त्याचे कॉर्नर पसरट असावे, जेणेकरून कोपऱ्यात हवेने जिओमेम्ब्रेन आपटत नाही.
  • जिओमेम्ब्रेन अच्छादनापुर्वी पाणी फवारून फिनिशिंग करणे अत्यावश्यक आहे. जेणेकरून पाण्याच्या आर्द्रतेमुळे जिओमेम्ब्रेन जमिनीला चिकटुन राहते.
  • जिओमेम्ब्रेन अच्छादन केल्यानंतर शेततळे लवकरात लवकर पुर्ण क्षमतेने भरावे, जेणेकरून जिओमेम्ब्रेन भविष्यात पृष्ठभागावर वाऱ्यामुळे आपटत नाही.
  • जिओमेम्ब्रेन अच्छादन करतांना कुशल कामगार असल्यास जिओमेम्ब्रेन अच्छादनास घड्या येत नाहीत.
  • जिओमेम्ब्रेन अच्छादनाचे काम हे जनरेटरच्या वीज पुरवठ्यावरच करावे, जेणेकरून एकसारखे व्होल्टेज मिळते व जोड व्यवस्थित बसतो.
  • जिओमेम्ब्रेन अच्छादन करतेवेळेस उंदरांचा उपद्रव टाळण्यासाठी फोरेट या किटकनाशकचा वापर करावा.
  • शेततळ्यातील पाण्याचा उपसा करण्यासाठी सबमर्सिबल पंप तळात न ठेवता रिकाम्या बंदिस्त २०० लि. बॅरलला व्यवस्थित बांधणी करूनच शेततळ्यात सोडावा.
  • शेततळ्याच्या आसपास ऊसाचे पाचट, गवत वा काडीकचरा पेटवू नये.
  • शेततळे पूर्णपणे रिकामे ठेवू नये, त्यात किमान दोन फुट पाणी ठेवावे.
  • शेततळ्यात पहिले पाणी भरतांना सुरूवातीला जिओमेम्ब्रेन कुठे ताणले गेल्यास ताण सैल करावा.
panipat logo
Close My Cart
Close Wishlist
Close Recently Viewed
Compare Products (0 Products)
Compare Product
Compare Product
Compare Product
Compare Product
Close
Categories